आत्मनिर्भर भारत अभियान व आत्मनिर्भर ग्राम अभियान प्रेरित महाएनजीओ फेडरेशन,पुणे आयोजित पंडीत दिनदयाल उपाध्याय व महात्मा गांधी जयंती आणि मा.नरेंद्र मोदी जी यांच्या ७० व्या जन्म दिनानिमित्त दि.१४ सप्टेंबर ते दि.२ ऑक्टोबर २०२० दरम्यान सेवा सप्ताह कार्यक्रमा अंतर्गत संकल्प फाऊंडेशन, सामनेर यांच्या वतीने सामनेर ता.पाचोरा जि.जळगाव या गावात निर्जंतुकरणीसाठी सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी केली. ही फवारणी गाडीत फवारणीचे मशीन ठेवून नळीद्वारे संपुर्ण गावात व गल्लीत फवारणी करण्यात आले.
उदघाटनावेळी व प्रत्यक्ष फवारणीवेळी श्री.वेद प्रकाशजी, डॉ.ए.पी.वाणी, डॉ.सागर सोनकुळ, श्री.साहेबराव पाटील, अमोल महाले, शिवाजी अभिमन पाटील, तसेच शिवाजी पाटील, मुकीम शेख, अक्षय चिंचोले, देवेंद्र पाटील, प्रशांत साळुंखे इ. गावकरी आणि संकल्प फाऊंडेशन पदाधिकारी इ. उपस्थित होते.

Leave a Reply